रेड रीबन क्लब (आरआरसी)

रेड रिबन क्लब (आरआरसी) हा शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी एक एच्छिक ऑन-कॅम्पस आंतरनिरसन कार्यक्रम आहे. गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीने याची सुरुवात व पाठबळ दिले असून बहुक्षेत्रीय सहकार्यातून, विशेषत: राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) संवर्ग अधिकार्‍यांच्या सेवेचा वापर करून त्याची अंमलबजावणी केली जाते.

क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयांतर्गत नेहरू युवा केंद्र संघटनेने (एनवायकेएस) जनजागृतीसाठी शाळाबाह्य युवकांसाठी रेड रिबन क्लब स्थापन करण्यासाठी करार केला आहे. 2007 पासून एनवायकेएसने दोन्ही जिल्ह्यांमध्ये शाळाबाह्य तरुणांसाठी 75 आरआरसी स्थापन केल्या आहेत.

आरआरसीचे उद्देश

  • सेक्स, लैंगिकता आणि एचआयव्ही/एड्स याविषयी जनजागृती करून तरुणांमध्ये नवीन एचआयव्ही संसर्ग कमी करणे.
  • एचआयव्ही / एड्स (पीएलडब्ल्यूएचए) असलेल्या लोकांना मदत आणि पाठबळ देण्याची भावना तरुणांमध्ये निर्माण करणे ज्यामुळे पीएलएचएविरूद्ध कलंक आणि भेदभाव कमी होईल.
  • नेतृत्व, मध्यस्थी आणि संघ बांधणीवरील कौशल्ये विकसित करून तरुणांना प्रेरित करणे आणि पीअर अधिशिक्षक आणि परिवर्तन एजंट म्हणून त्यांची क्षमता वाढविणे.
  • युवकांमध्ये स्वेच्छेने विनामोबदला रक्तदानाला प्रोत्साहन देणे.
  • 2007 पासून गोव्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये 171 रेड रिबन क्लब (आरआरसी) स्थापन करण्यात आले आहेत.